प्रसंग सतरावा - शिवा (चक्रा) ची भेट
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मग बोले ईश्र्वर राज । बीजें केलें कवणिया काजा । तें मजपें सांगावें वोजा । पिपिलिकेनें ॥६७॥
शंकरा वचन परियेसी । मनुष्यदेह लाधलों सायासीं । अहंकार दावा करी आम्हांसी । तो कैसा मारावा ॥६८॥
मग बोलिला भवानीनाहो । तुम्ही भक्तीची शीलें करा हो । करी खड्ग घेउनि भावो । त्वरित उठावें ॥६९॥
इतुकें ऐकतां उत्तर । स्वयें न्याहाळिलें सबाह्यांतर । पाठीराखें केले बीजाक्षर । सद्गुरु नमस्कारूनियां ॥७०॥
तेथूनि चालिलों प्रातःकाळीं । स्थिरावलों विशुद्ध कंठकमळी । स्वयें आत्मनाथा सोवळी । एकांग शूर ॥७१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP