प्रसंग सतरावा - स्वारीची तयारी
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
अष्टदळावरी होतें मन । औट औट पळें करी उड्डाण । त्याचें घोडें केलें जाण । स्वार व्हावया ॥९५॥
मग मनाचें करूनी घोडें । वर चित्त जिन घातला निवाडें । मग उडोन बैसलों कैवाडें । वासना वाग् अवरोनियां ॥९६॥
शीघ्र करीं घेतली कमान । तेजियावरी आत्मा राऊत निधान । वोढी विवेकाचे तीर जाण । विवेकें सोडितसे ॥९७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP