मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
विकल्‍पाचा पाडाव

प्रसंग सतरावा - विकल्‍पाचा पाडाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


विकल्‍पें येऊनि आत्‍म्‍यापाशीं । म्‍हणे राया माता परियेसी । अहंकार म्‍हणे तुम्‍हांसी । संवदळी भांडो ॥१०२॥
श्रवणी इतुकी बोलतां बोली । आत्‍मा राऊतें कमान वाइली । कटी मस्‍तकीं विंधिली । विकल्‍पाचे ॥१०३॥
विकल्‍प पाडिला धरणी । स्‍फुरण चढलें आत्‍म्‍यालागुनी । म्‍हणे यश आलें पहिलेंच भांडणीं । सद्‌गुरुप्रसादें ॥१०४॥
आत्‍मा ब्रह्मानंदे वोसंडला । तेजियातें मैदान दाखवूं लागला । तेजीहि बळें थरकों लागला । ठायीचें ठायीं ॥१०५॥
पश्र्चिम दिशे ऐकले अहंकारें । कटक गजबजलें महा मारें । तें सांगेन ऐका उत्तरें । श्रोते हो तुम्‍ही ॥१०६॥
अहंकाराचा कटक मेळा । एकाहून एक वीर आगळा । तो सांगेन ऐका निर्वाळा । बयाजवार परियेसा ॥१०७॥
ओळखा पांचाचें पंचविस गुण । लिंगदेहाचे पंचविस जाण । ऐसे हे पन्नास मेळऊन । तोंडावरी दिधले ॥१०८॥
मागें पाठीवरी अहंकार । पुढें चाले सकळ परिवार । ठायीं ठायीं तोलतील भार । संग्रामालागुनियां ॥१०९॥
फार जळ आटल्‍याउपरि । जळचरें आकांतती परोपरी । तैसें अहंकाराचें कटक करी । चळबळ अविचारे ॥११०॥
कटक सांवरून अहंकारानें । दिधली अविश्र्वासाची पानें संकल्‍पासी बोलाऊनि अभिमानें । विडा दिधला ॥१११॥
अहंकार म्‍हणे रे संकल्‍पा । तुवां पुढें झिज लावावी रे बापा । मागुनी माझिया दापा । कटक फुटों न शके ॥११२॥
संकल्‍प म्‍हणे जी अहंकारा । विकल्‍प माझा धारा । तो मारीला श्रेष्‍ठ मोहरा । आतां मी उणा पडलों असे ॥११३॥
येथून आतां अपेशाचें मूळ । मज दिसतें गा प्रबळ । आत्‍मा राउत जाला सबळ । मन तेजी फिरवूनियां ॥११४॥
मन विकल्‍प होते श्रेष्‍ठ राउ । ते जेधवां केलें पाडाउ । तेधवांच खुंटला उपाउ । पुरुषार्थ भांडणाचा ॥११५॥
अहंकार बोले संकल्‍पाप्रती । म्‍यां गड राव जिंतिले असंख्याती । सिद्ध साधक मज भेणें कांपतीं । सूड घेईन तुझ्या बंधूचा ॥११६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP