मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
संकल्‍पाचा पाडाव

प्रसंग सतरावा - संकल्‍पाचा पाडाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मग संकल्‍पासी आलें स्‍फुरण म्‍हणे आतां पुरुषार्थ करीन । आत्‍म्‍यातें जितांच गिळीन । निमिष न लागतां ॥११७॥
मुहुर्त घटिका रिती वेळ । सवें मागितला राग आळंगील । पायप्यादा चंचळ चपळ । संकल्‍पापुढें चाले ॥११८॥
सन्मुख आला संकल्‍प राणा । म्‍हणे सावध होई आत्‍म्‍या सगुणा । चाल ये वेगी जुंझों भांडणा । आतां कोठें जाशील ॥११९॥
मागे गडगडले महावीर । एक एकी केला घे घे मार । विषयबाणांचा धूर । भ्रांति अंधःकार पडियेला ॥१२०॥
मग आत्‍मा म्‍हणे जी ईश्र्वरा । आम्‍हां सुमुहुर्त सांगावा बरा । ईश्र्वर म्‍हणे यशवंत होसी खरा । तेजी ढकली पां वेगीं ॥१२१॥
मग नमूनियां सद्‌गुरुरावो । डावा घातला पाउंडा पावो । सांडूनियां सकळ भिन्न भावो । रिकेबी केली ॥१२२॥
राग आळंगिला पायप्यादा । तो खुंदलोनी केला मैंदा । संकल्‍प सांवरोन होय शुद्धा । तो विंधोन पाडिला ॥१२३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP