अभंग १

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - जिलहाकाफी
( चाल : काय तुझे वेचे )

तन्मय वृत्ती होतां मग चिन्मय स्वरुप ॥
अंतरीं पाहतां दिसे प्रकाशरूप ॥धृ॥
भक्तियोगें होतां निर्मल अंत:करण ॥
त्या हृत्कमळीं वास्तव्य करी नारायण ॥१॥
मायामोहाचें नष्ट होतां आवरण ॥
संतकृपा पूर्ण झाली हे जाण ॥२॥
संताशीं सहज होता भाषण ॥
संकल्प विकल्प जाती मनांतून ॥३॥
मग एकच विषय अखंड नारायण ॥
दासीनें दृढ धरिले विठ्ठल - चरण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP