अभंग ३९
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भूप
( चाल : ब्रह्मानंद नाम सोव्हळा )
विठ्ठला विठ्ठला माझ्या मायबापा ॥
आनंदला जीव पाहुनी श्यामरूपा ॥धृ॥
सफल वाटे झालें जीवन ॥
एकदा घडला तुमचें दर्शन ॥१॥
चरणस्पर्श होता मम डोई ॥
प्रेमानें फुलले रोमांच देहीं ॥२॥
मग दृष्टि हरिपदीं स्थिरली ॥
भावशुद्ध वृत्ति ही बनली ॥३॥
प्रेमादरें दासीचें एक मागणें ॥
नलगे कांहीं आणीक तुमचे चरणाविण ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP