अभंग १५

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग- बिहाग
( चाल : अवघेची त्रैलोक्य )

बहु आनंद झाला जिवाला ॥
सखा विठुराज भेटला मजला ॥धृ॥
ज्याचा ध्यास नित्य मनाला ॥
त्याचे दर्शने जीव हर्षला ॥१॥
पद स्पर्शे रोम रोम फुलला ॥
प्रेमाने जीव हा गहिवरला ॥२॥
शक्तीहीन मी झाले विठ्ठला ॥
पुन्हा कधी भेटशील देवा मजला ॥३॥
हाची एक ध्यास असे जिवाला ॥
तव पदी ठाव दे आतां दासीला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP