अभंग १९

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - शंकरा

नित्य नवोदित हरिरूप आगळा ॥
त्यांत अति सुंदर कृष्णसावळा ॥धृ॥
मूर्तीमंत दयेचा प्रेममय पुतळा ॥
समदृष्टीनें पाही सानथोरा सकळा ॥१॥
तुझ्या नामाची थोरवी जन गाती प्रेमळा ॥
भजनांत रंगुनी जाती भानरहित दयाळा ॥२॥
तुझ्या दर्शनाचा दिव्य अपूर्व तो सोहळा ॥
पाहुनी सफल झाले जीवन तूं त्याचा जिव्हाळा ॥३॥
ऐसा तुझा महिमा किति वर्णूं गोपाळा ॥
दासीची तुंचि एक देवा जीवनकळा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP