अभंग २७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांडपहाडी
चाल : या हो देवा आता
लोहचुंबकासम देवा झाली गत ॥
ओढुनी नेलेसी मज पंढरीत ॥धृ॥
सांजवेळ होती गेले राऊळांत ॥
दुरूनी पाहता देव उभा तटस्थ ॥१॥
मग सन्निध जाता देव भेटला निवांत ॥
आनंद समाईना माझ्या हृदयांत ॥२॥
अंतर साक्षी तुं जाणुनी मम हेत ॥
पुरविलास भाव देवा रुक्मीणीकांत ॥३॥
तुझ्या दर्शने विठ्ठला जिव उल्हासीत ॥
अतिसमाधाने दासी घाली दंडवत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP