अभंग ३२
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - पहाडी
चाल : “ राधे तुला पुसतो ग घोंगडीवाला ”
तुझ्या अनंत उपकाराच्या राशी ॥
कैसी होऊ उतराई हृषीकेशी ॥धृ॥
माझ्या दीन हाकेसरशी ॥
कैसी प्रभो धाऊनी तू येशी ॥१॥
आत्मविश्वासे मना धीर तूं देशी ॥
समयी संकट हरुनी देवा नेशी ॥२॥
दीन दासीवरी निरंतर कृपा अशी ॥
ठेवी देवा हेच मागणे तुजपाशी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP