अभंग ३३

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - मांड

श्रीज्ञानेश्वरा कृपा करा ॥
चंचल मन हे आवरा ॥धृ॥
विनवी तुज ही पामरा ॥
तव पदी मन हे स्थिर करा ॥१॥
संसारांतील हा पसारा ॥
तेणे जीव होई बावरा ॥२॥
ही मनस्थिती आतां आवरा ॥
दासीला पदी द्या पूर्ण थारा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP