अभंग २४

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - बागेश्री
चाल : सखा विठूराज

हरीच्या भक्ती रंगी रंगले हो ॥
त्या दिव्यरूपी दंग झाले ॥धृ॥
कांहीं क्षण मम भान हरपले ॥
हरीप्रेमे रोम रोम मग फुलले ॥१॥
समाईना हर्ष हृदयी अती आनंदले ॥
प्रेमादरें भक्तीभावें हरीसी नमिले ॥२॥
सुकोमल शामल ती पदयुगले ॥
दासीने प्रेमभावे हृदयी दृढ धरीले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP