अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड
चाल : करी धरूनी बासरी
हरी प्रेमे होता नि:संग ॥
मग घडेल हरीचा संग ॥धृ॥
चढे जिवनी मग रंग ॥
रंगी रंगला हो श्रीरंग ॥१॥
कमल वदनी कमल रंग ॥
जैसा रती पती अनंग ॥२॥
हरी भजनी येई मग रंग ॥
भजनी झाली दासी दंग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP