अभंग १२

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - काफी
( चाल : काय तुझे वेचे )

कैचे पडले कोडे देवा दर्शन देण्या ॥
उत्कंठीत मन हें भेट घेण्या ॥धृ॥
दीन दयाघन म्हणविसी आपणा ॥
धावत येसी अनाथा कारणा ॥१॥
न मनीं आणसी सानथोरपणा ॥
अनेक संकटे करी निवारणा ॥२॥
ऐसा तूं दीन दयाळू यदुराणा ॥
प्रेमादरे दासी नमीत चरणा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP