अभंग ३५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - पहाडी
चाल : मिटली जिवाची
आनंदी आनंद जिवनी आनंद ॥
नामगाता नित्य गोविंद गोविंद ॥धृ॥
मग भजनांचा लागला छंद ॥
त्यांत रमे जीव गाता मुकुंद ॥१॥
आनंद कंद माझा गोविंद ॥
नंदनंदन असे सुखकंद ॥२॥
दासी जिवनांत रंगला गोविंद ॥
हृदयी अखंड सखा मुकुंद ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP