अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - सारंग
हरी नाम घोषें, मंदिर निनादलें ॥
त्या योगें मम रोम रोम फुलले ॥धृ॥
हरी प्रेमभाव अंतरी उचंबळले ॥
हर्ष उन्मादें कैंचे भान न उरले ॥१॥
ऐसी जव होई भावना प्रदिप ॥
हृदया भितरीं विलसे कृष्णरुप ॥२॥
आनंदाचा तो समय जाता विलया ॥
वाटॆ जीवित व्यर्थ जात वाया ॥३॥
तोची आनंद अखंड मज लाभावा ॥
हेच दासी नित्य मागे तुम्हां देवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP