अभंग १३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - काफी
आतां भेटेल माझा देव ॥
सखा विठुराज केशव ॥धृ॥
भावे दृढ धरीन चरण ॥
डोई चरणांवर ठेऊन ॥१॥
हरीचे आलींगन सुख भोगीन ॥
श्रीमुख पाहीन डोळे भरून ॥२॥
मग कृतार्थ होईल जिवन ॥
अत्यादरे दासी करी नमन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP