अभंग ३६
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भैरवी
चाल : मंजुळ मंजुळ
हरी मज दावा हरी मज दावा ॥
जगभर हिंडले गावोगांवा ॥धृ॥
वेड्यागत फिरले ठायीं ठाया ॥
परी न दिसला देवराया ॥१॥
मग दु:ख वाटलें अती मनीं ॥
मग धांव घेतली गुरुचरणीं ॥२॥
प्रेमळ भाषणीं गुरुरायांनी ॥
अंतरीचा देव दिला पटवुनी ॥३॥
अज्ञमती ही दूर करूनी ॥
आनंद केला दासी जीवनी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP