अभंग २२
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड पहाडी
गोकुळचा राजा, कृष्ण सखा तो माझा ॥
विश्वपती त्रिभुवनीचा, प्राणेश तो जगताचा ॥धृ॥
काय वर्णूं लिला त्याची ॥
कुंठित झाली मती माझी ॥१॥
हा जगत् पसारा मांडीला ॥
त्याचा तोची खेळ चालविता ॥२॥
सुखदु:खाचा लाऊनी वारा ॥
अंती देई पदी अपुल्या थारा ॥३॥
असा जो अनंत विश्वनायक ॥
तोची या दासीचा पालक ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP