आला नवा आदेश, बिजातुन स्फुरला नव अंकुर
महाराष्ट्र देवता वाजवी, मंजूळ सनई दूर ॥ध्रु०॥
स्वागत करती दाहि दिशा या, ओवाळून आरति शिवाला ओवाळून आरति
फितुरीचा तो खेळ हरविण्या संत थोर जागती आमचे संत थोर जागती
जिजा माउली पुण्य उधळती राष्ट्रातील घरभर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥१॥
शौर्याचे रणशिंग फुंकुनी शूर दावितो बाणा अमुचा शूर दावितो बाणा
शत्रूसंगे झुंज खेळतो सवंगडयासह राणा शिवबा सवंगडया सह राणा
भव तापाचे संकट हरले सुख चाले तूर तूर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥२॥
गिरी शिखरातून नद्या वाहती भय सोडून खळखळ वाहती भय सोडून खळखळ
अभयाचे वरदान मिळाले उसळून आले बळ तयांचे उसळून आले बळ
नत मस्तक होवूंया शिवाच्या जाउन चरणावर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥३॥
भिमा कोयना काठावरली क्षेत्रे ही जागली आमुची क्षेत्रे ही जागली
पंढरपुरच्या विठूरायाला शांत झोप लागली पहा हो शांत झोप लागली
वारकर्यांच्या कंठा मधुनी घोष घुमे हर हर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥४॥