मल्हारी किती तुजे गुण गाऊं, तुझ्या चरणीं लपट होऊं ॥चाल॥
नऊ लक्ष पायरी जेजुरगडाला, दीपमाळ हारोहारि दोहि बाजुला ॥
देव दवणा भंडार वाहूं, तुझ्या चरणी लपट होऊं ॥मिळवणी॥
बाणु म्हाळसा दोघी या नारी, पाठी भैरवनाथ आहे जोगेश्वरी ॥
दर्शन तें घेऊं तुझ्या चरणीं लपट होऊं ॥मिळवणी॥
रंभाई शिंपिण, पुढें फुलाई माळीण हार घालिती परोपरीन ॥
मल्हारी देव पाहूं, तुझ्या चरणीं लपट होऊं ॥मिळवणी॥