खंडे राया देवा मल्हार तुला दोघीया नारी,
एका परीस एक आहेत दोघी सुंदरी
जसी रे ज्योतीमध्ये ज्योत म्हाळसा आहे ग रत्न,
जशी हिर्याची ग खाण बानुबाई आहे सुज्ञान ।
सुवर्ण केश कुरळे शोभे तुमच्या या कारण ॥
घेऊनी हातामध्यें ऐना बाणु कुंकू लावुन ॥चाल॥
भांग मोत्यानी शिरी भरुन जी कपाळी कुंकू लावून जी
बाणुचे रुप दारुन जी खंडेराव आले लुवदुन जी ॥मिळवणी॥
अहो जसा दिसे हिल्लाळ अमृत ढाळ बिनीपरी
धनगराच्या घरीं जन्मली बानुबाई खरी जी खंडेराया॥
रंगमहालमधीं पलंग टाकिला दोहीची खुण उंच शाल नेसून बनली पद्मीण जी ॥चाल॥
मुद राखडी आहे शिरी चारी बोरवेणी वरि जी, चंद्रकोर शोभे त्यावरी जी,
घोस वाळ्याचे कापावरी जी गळा गरसुळी
पेंड मोत्याचें चित्त पेत्यावरी आणिक माळ चमकती माळ हार त्याच्यावरी ॥२॥
पृथिवीचा धनी दक्षणि जागा आहे थोर आखंड गर्जे पृथिवीवरती राजा मल्हार जी ।
मोठे मोठे उमराव येती लेवून भंडार बगाडे लावितो,
त्याचे सत्व आहे थोर जी ॥चाल॥
मुखी येळकोट बोलती, पाप दोष भंग जाती देव खंडु विनविती,
स्वामीराया हैबती असुनी द्यावी दया कृपेची छाया मल्हारी,
सदा भाव अंतरी आले विघ्न दूर करी ॥खंडेराया॥३॥