बाणु म्हाळसाच्या छंदा लागला कसा,
देव झाला कीं वेडा पिसा बाई देव झाला कीं वेडा पिसा ।
बाणु देव गेले कीं चंदन पुरी, वाहवा गे बाणु वाहवा
करुं लागला चाकरी, शेळ्या मेंढयाचा बनला खिल्लारी,
देख देवराया पडतो पाया आलो गाया,
देव झाला कीं वेडा पिसा ॥१॥
बाणु नार दिसे अनिवार, वाहवा गे बाणु वाहवा,
स्वरुप दिसे चंद्राची कोर, वेडा झाला देव मल्हार,
देख देवराया पडतो पाया, आलो गाया
देव झाला कीं वेडा पिसा ॥२॥
देव झाले कीं घोडयावर स्वार, अगे वाहवा गे वाहवा बाणु वाहवा
संगे घेऊन बाणु सुंदर, आणुनि ठेविली अर्ध्या गडावर चोरुन भंडार पडती तिजवर
देख देवराया पडतो पाया, आलो गाया,
देव झाला कीं वेडा पिसा ॥३॥