भरगच्ची पायजमा अंगामधि झगा बांधला चिरा ।
लिंगकार गळ्यामधी डौल पठार लिग मोहरा ॥
बिगबाळी कानी चौकडा, मुदीवर खडा चमकतो हिरा ।
लालीलाल अंगावर शाल, मोत्याचा तुरा ।
घोडयानीं धरते मंडळ अष्ट कमळ फिरतो वारा ॥
स्वरुपाच्या फाकल्या प्रभा जशा काय तारा ॥चाल॥
देखली नाम नगरी आरे मालु निळ्या घोडयावर आहे
स्वारी आरे मालु तेथें उतरले मल्हारी अरे मालु॥मिळवणी॥
नगर नारी सांगती तिला रंभाई शिंपिणीला मुशाकर गुंडाजी
जी आम्हा वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा
मन पवन वारु तो रंग नाम फीरंग हातामध्ये खंडा जी ।
आम्हा वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥१॥
बोली बोलतो कानडा पुसतो बागा चालला नीट जी जी ।
रंभाईने पाहिला देव राजे निळकट पांची प्राणांची आरती घेऊन
राव हातीं सोन्याचें ताट अभिमान रांगोळ्यावर योगाचे पाट जी ॥चाल॥
लावी उटने नानापरी आरे मालु तेल अत्तरमय लावी गिरी आरे मालु ॥
उंच आबीर विज्यापुरी आरे मालु प्रेमळ सुगंधी कस्तुरी आरे मालु । मिळवणी ।
घंगाळी पाणी चौरंग न्हाती श्रीरंग चांदीचा हांडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ।
मन पाहून वारु तो रंग नाम फी रंग हातामध्ये खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥२॥
सुकुमार वस्त्र अंग पुसा पितांबर नेसा भडक जरी काठीं
अंगीं भंडाराचें भूषण टिळा ललाटी जी हा आत्म निषद हारु
हार नाजुक प्रकार भरीत तूप रोटी
आहो रोटी तूप पोळ्या साळीचा भात सुगंधीक आमटी जी ॥चाल॥
साठ भाज्या कोशींबरी आरे मालु लोण्याच्या चटण्या हारो हारी ।
आरे मालु घारगे वडे अरे कुरकुरीत अरे मालू ॥मिळवणी॥
परोपरी वाढिल्या खिरी साखर नाहीं पुरी दुधामधि मांडा
आम्हां वाघ्यापुढें गरजतो भडकतो झेंडा मन पावन वारु
तो रंग फी रंग हातामध्यें खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा
अचवून घेतला विडा तबकामध्यें पुडा फुलांचा हार पोशाख केला
देवाला जडित सिनगार लालीलाल चमकतो माहाल कोंदणें लाल
हिरे कंकर आंत टाकला पलंग समया चार रंभाईच्या पाहुनी भाव प्रसन्न झाले देव ।
आवई दिलीवर देव भक्ताचा कनवाळू कृपासागर ॥चाल॥
घेऊन आला सुन्दरी आरे मालू ठेवली करेच्या तिरीं
आरे मालू सहा महिन्या सोमवारीं आरे मालू देव जाती तिच्या मंदिरी आरे मालू ॥मिळवणी॥
गुरु मुकींद मनामध्यें धाले सागरी न्हाले प्रेमपुरी लोंढा बाणु
वाघा चरणीं स्थरी पायरीचा धोंडा मन पावन वारु तो रंग फी रंग
हातामध्ये खंडा आम्हां वाघापुढें गरजतो भडकतो झेंडा ॥४॥