गिरीवरले गिरीवर जायक पठार लिंगा आदिशक्ति म्हाळसा बानु शोभती गंगा ।जी।
शिव शिव नामामृतरससार श्रवण करावें वारंवार जावें बहुसागर उतरुन फार ।मिळवणी ।
भक्तिमुक्तिच्या दरबारी रंगले रंगा । आदिशक्ति म्हाळसा बानु शोभती गंगा ॥१॥
पति घालुनिया बळकट मिठी पाहावे शोधून
अंतर दृष्टी प्रभुनें रचना रचली सृष्टी त्यामधी भक्तजनाच्या भेटी होती प्रसंगा आदिशक्ति ॥२॥
करुनिया कर्माचा नाश जावे बहुबंदन तोडून पाश,
जगदीश पुरविल आस मिषशील दंगा आदिशक्ति ।
रामभाऊ सदा सेवक भिकारी गळ्यामध्ये घालुनिया भंडारी
उभे सद्गुरुना याच्या द्वारीं कर जोडून मागतो वारी मिळून सत्संग ॥मिळवणी॥४॥