ढोल वाजतो तर्हेदार ॥ वाघे देती हुंकार ॥ढोल० ॥
मुरळ्या नाचती होती तुर देवाची समोर ॥मुरळ्या॥
गजर झाला अवघ्या भक्ताचा, मानवरायाची न्हाणी
होत माशाची घोडे दोहो बाजूस, देवाची न्हाणी॥
चितो काढली हो माजेची ॥ गाय मुख देवाचे चित्ते ॥
तेथें सकळीक हो तीर्था घेता हत्ती ॥
आहे दरबारांत शिव बाणा चालिले रुमाल चवर्या उडवीत
आबदागिर्या साहित्य चालले ॥