अश्विन महिना प्रातःकाळीं नहाती कर्हेच्या तिरीं, फुले पुष्पातें ओटया भरी,
भरुनि कर्हेचे पाणी कळस चंबू चांदिचा शिरी,
दाट कांसडया सोनेरी मिळुनी सर्वांचा थाट,
चालला वाट धरोनी हारोहारी, एका मागें एक सुंदरी,
सतरावीचा घाट चढता वाट जाती पठारी,
उंच मेरुच्या शिखरी, घालूनि कर्हेचे स्नान देवाला बाणु
म्हळसा सुंदरी, उभे भैरव जोगेश्वरी, आश्विन महिना यात्रा भरति
आनंद होतो जाग्रणी चला जेजुरी साजणीला
रात्रन् दिवस माझ्या नयनी बसतो दिसतो
माझ्या मनी चल जेजुरीला साजणी ॥१॥
पहिल्या प्रहरी निघतो छबिना उजवे मानेवरी वाघा गरजतो
दरबारी गर गर गर गर गिरक्या मारितो
नानापरि ढोल सनया नाद किलकारी मधे मुरळ्यांचा थाट
भोंवताली दिव दिवटया हारोहारी एका चढीत एक सुंदरी
उंच पैठणीचा शालू नेसाया काठ पदराला जरी खुप श्रृंगार बनला
परी तीन प्रहर मग जागरण झाले चौथ्या प्रहरी तोंड धुन चल जेंजुरीला साजणी ॥२॥
विजय दशमीला स्वारी शिलांगण हुकुम प्रधान प्रति कुंचाजीले
डंके वाजती मानकर्याचा थाट बरोबर गोपाळ आरती पालखीत म्हाळसापती ।
गिरीकंदराच्या चार रस्त्याकडून स्वारी पहाडाहून केवढी मौज दिसती बाणामागे बाण सोडिती ।
एका बाणाचा घा उभयता आंत त्याने भेटती होती आवाज पहाड गरजती होती
आपटयाची पूजा ब्रह्मदेव सांगती नारदमुनी चला जेजुरीला साजणी ॥३॥
थेट रमण्यामध्ये स्वारी चमकती उत्तरे समोर जे जे
वाडी मूळ पाठार उजवी घेऊनी मारुति वेशीमध्ये येशवंत मल्हार बाजूला
भाक होळकर चंदी चंदवडजे राजे अक्कलकोट, भरतपूर, जाकपूर,
शाहु राजे सातारकर, शुष्क रंगाचे हत्ती सजविले,
हौद अंबारीवर लखलख कळस झालर नदर पेटमध्यें
स्वारी थोपली खुली रात्र चांदणी चला जेजुरी साजणी ॥४॥
झोकनोक स्वारी चाक लावा उजवी घेऊनी मारुती रस्त्यानें
स्वारि मिरविती दो रस्त्यावर सावकार मंडळी दीप दिवटया घेऊन हाती ।
भर ओंजळ भंडार उधळती । अपार पेटल्या दिवटया हारोहारी दीपमाळ जळती स्वारी चढतां,
मौज दिसती आली किल्ल्यामध्यें स्वारी चौघडे गंगनाम गर्जती नानापरी वाद्ये वाजति मुकिदेगिर
प्रसन्न बापुचे चित्त त्याच्या चरणी कडे पठार आमचे धनी रात्रन दिवस माझ्या नयनी,
दिसतो बसतो माझ्या मनीं चल जेजुरीला ॥५॥