नित्य देव मल्हारी ग ॥ मस्तकी शोभतो तुरा, बेंबीमधें हिरा ॥
नवरा रंग दीसे सीरा शंभाचे अवतार, ठान तयाचें मैराळ ॥
काय सांगु देवाची मात, आलीस भरांत बसुनी दिनरात,
खेळती चवसर, तिसरे ठाणें नलदुर्ग खरं, देवपाल पेंबरी आले,
लग्न लागले, वाद्या वाजले, मनी खुश जहाले, शंभाचे अवतार,
केवळ कैलास जेजुरी ॥१॥चाल॥१॥
हा त्रिलोकयाचा धनी, नांदतो गुणी, भाव धर मणी,
पावला मल्हारी केवळ कैलास जेजुरी ॥२॥
जर ह्या वारु वरती स्वार गं. आदी शक्ति अवतार,
स्वरुप शकुमार, माहाळसा नार, घेतली घोडयावर,
कवटाल्या देव मल्हारी, ज्यानें मेघ बोलाविले वरह वर बिलें,
आंगणी नाहाले, माणिक मोती कंकर, वाण्यानी भरले घर,
ज्यानें आनंद केला फार, चालला भार, कडे पठार,
देवाची आली स्वारि केवळ कैलास जेजुरी ॥
हा त्रिलोकयाचा धनी, नांदतो गुणी, भाव धर मणीं,
पावला मल्हारी केवळ कैलास जेजुरी ॥३॥
कुरुम कासवाच्यावर, वाहा मुरळी नाचती फार,
मिळुनी हारु हार, दिवटयांचा भार, लावती भंडार,
वाघापुधें तोडी लंगर जनभक्त येती, नवस करिती,
बगाड घेती मोठे मोठे सरदार, चंपा शेष्टीचा गजर,
काय लवाण आले, तेल लागलें, नवरे झाले,
हाती शोभतों खंजीर, मानकरी थाट बरोबर,
ढोल करणीं, सनया वाजती कीं, सोले होती बापु गुण गाती,
लोळती चरनावरी, केवळ कैलास जेजुरी,
हा त्रिलोकयाचा धनी ॥ अहो कडेपठार, लिंग अवतार,
जनभक्तासाठीं देव जगजेठी बैसले निराकार, प्रकट केला आकार,
दोही बाहुस दोघी नारी मधीं मल्हारी अस्ट आधिकारी बैसले चातुर मोर चेला उडती
वर पाठीशी भैरवनाथ, बसून दिल रात, काय सांगू मात,
बाळ ही जोगेश्वरी, केवळ कैलास जेजुरी, हा त्रिलोकयाचा धनी,
नांदतो गुणी, भाव धर मणी, पावला मल्हारी, केवळ कैलास जेजुरी ॥४॥