बोला बोला हो तुम्ही बोला वाचे येळकोट तुम्ही बोला भंडार वाहूं मल्लारीला,
बाणूम्हाळसा नारीला, श्रावणमासी, भक्त येती, करेचें पाणी स्नानासी घेती ॥
उठा उठा व जलदी करा, खंडेरायाचें नाम स्मरा, अक्षी मनामध्ये भाव धरा
आदितवार दिवस आला ॥ कडे पठारी तुम्ही चला ॥
चुकेल चौर्याऐशींचा फेरा ॥ बोला हो बोला० ॥१॥
सोन्याची जेजुरी, तिथें नांदे मल्लारी,
तो आमुचा कैवारी, गळा घालूं भंडारी,
नवलक्ष पायरी दीपमाला हारोहारी तूं आमुचा कैवारी,
गळा घालून भंडारी, उभा होय सामोरी ॥
सभा शोभे महाद्वारी ॥ बोला बोला० ॥२॥