Dictionaries | References

आकळणें

   
Script: Devanagari
See also:  आंकलणें

आकळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

आकळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   confine; comprehend, comprise.

आकळणें

 उ.क्रि.  
   ओढणें ; निग्रह करणें ; ताब्यांत ठेवणें ; बांधणें . परी त्या गर्वे आकळिलीं - रासपं २ . ५९८ . अंगुष्ठमात्र प्राण पुरुष । आकळोनि काढिला । - मुवन ६ . ६३ .
   समजणें ; बोध होणें ; लक्षांत येणें ; आटोक्यांत , आवांक्यांत येणें . किती समुदाय आकळेना । - दा १९ . १० . ११ . बळें आकळेना मिळेना मिळेना । - राम १४२ . - एभा २० . ६९ . परि योग्य वीर समर - क्रीडोत्सुक - चित्त काय आकळतें । - मोभीष्म १२ . ६५ .
   ( ल . ) आवरणें ; किंचित मर्यादित करणें ( धंदा , प्रकरण वगैरे ).
   सांपडणें . अहं सोहं ब्रह्म आकळलें । - तुगा ४०३६ .
   व्यापला जाणें . तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला । - ज्ञा १ . १९० .
   ओढून घेणें ; वश करणें . स्वाधीन ठेवणें . - एभा २९ . ४७ . तुझें कुशल नाम बा हळुहळु मना आकळी । - केका ७४ .
   जवळ घेणें ; ओढणें ; कुरवाळणें . ( ल . ) चुंबिणें . थानें चोळूनिशानें वदनकमळहि आकळीलें पतीनें । - विठ्ठलकृत रंसमंजरी १० . [ सं . आकलन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP