Dictionaries | References

खपणें

   
Script: Devanagari

खपणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khapaṇēṃ v i To work, labor, toil. 2 To sell or go off; to obtain a vent or market--goods &c. 3 fig. To be consumed, expended, exhausted. 4 To be disposed of, i. e. to die.

खपणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   toil. sell. fig. be consumed, die.

खपणें

 अ.क्रि.  काम करणें ; मेहनत , कष्ट करणे . ' इंग्लंड सारख्या देशांत सार्वजनिक कमासाठीं अहोरात्र मोठेमोठे लोक खपतात ते ह्या करितांच .' - टि ४ . ५४८ . २ विकलें जाणें ; खप होणें ; विकत जाणें ; गिर्‍हाईक मिळणें ( माल इ० ला ). ' बाजारात नासका माल खपत नाहीं .' ३ ( स ) खर्चणें ; व्यय होणें ; संपणें .' घरांतले धान्य सर्व खपलें .' ४ वाटेस लागलें ; मरणें . ' दुसरे दिवशी हरिच्या दृष्टिपुढें अर्जुनाशुंगें खपला । ' - मोकर्ण १ . २ . ५ आवडणें ; सोसणें . ' ती सवत तुला खपणार नाहीं ' - कोरकि २९ . ( सं . क्षणपम ; क्षप - घालविणें .)

खपणें

   खपे तो खाई, खाई तो वाही
   जो काम करतो त्‍याला पोटभर खावयास मिळते व ज्‍याला पोटभर खावयास मिळते त्‍याला आंझ वाहण्याचे सामर्थ्यहि येते. यावरून श्रम केले तर त्‍यावर सर्व पुढच्या गोष्‍टी अवलंबून असतात. याकरितां आळस टाकून श्रम करीत असावे. जो जमीनीची मशागत करतो त्‍यास तिचे उत्‍पन्न खावयास मिळते व जो ते उत्‍पन्न खातो तोच ती जमीन वाहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP