Dictionaries | References

बलुतें

   
Script: Devanagari
See also:  बलोंतें

बलुतें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
balutēṃ n A share of the corn and garden-produce assigned for the subsistence of the twelve public servants of a village, for whom see below. 2 In some districts. A share of the dues of the hereditary officers of a village, such as पाटील, कुळकरणी &c.

बलुतें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A share of the corn and gardenproduce assigned for the subsistence of the twelve public servants of a village.

बलुतें     

 न. 
गांवांतील बारा बतनदारांना अथवा हक्कदार कारुंना शेतांवर त्यांच्या हक्काबद्दल गांवकर्‍यानीं नेमून दिलेला धान्याचा , बागाइताच्या उत्पन्नाचा वांटा ; गांवकर्‍यांच्या गरजा भागविण्यासाठीं कारुंना कुणब्याकडून मेहनताना म्हणून मिळणारा पिकाचा वंशपरंपरागत वांटा .
( कांहीं ठिकाणीं ) पाटील कुळकर्णी इ० गांवच्या पिढीजात कामगारांचा हक्काचा वांटा .
वरील बारा वतनें :- कांहीं महारबलुतीं ( मुसलमानी व मराठी राज्यांत मिळणारीं ):-
सितादेवी किंवा उभ्या उसाचा भाग .
वेशीवरची देणगी .
शिमगीपौर्णिमेस होळीचा नैवेद्य .
बेंदूर - आषाढी पौर्णिमेला धान्य .
हातशेकणें = गुर्‍हाळावरील भट्टीचें बलुतें .
मृत जनावरांचे अवशेष .
घरट्टक्का .
दफनाचे खड्डे खणण्याचे पैसे .
खळ्यावरील दाणे .
पेवाच्या तळाचे दाणे . इ० - अस्पृ ३७ . येश जय प्रताप कीर्ति । हे अयोध्येचीं बलुतीं । - वेसीस्व ६ . ६३ . [ का . बल = उजवा + कुड = देणें ; बलुता = उजव्या हाताचा हक्क म्हणून देणें ] बलुतेदार , बलोतेदार , बलुत्या , बलोत्या , बलुलौता , बलोलौता - पु . बलुत्यावर हक्क असणारा गांवचा वतनदार ; सरकारी कामगार पाटील , कुळकर्णी इ० कांहून हे भिन्न असून बारा आहेत :- १ सुतार , २ लोहार , ३ महार , ४ मांग ( ही पहिली किंवा थोरली कांस किंवा वळ . यांपैकीं तिघांचा धान्याचे चार पाचुंदे किंवा कणसासह २० पेढ्यांवर हक्क आहे व महाराचा ८ पाचुंद्यांवर हक्क आहे ), ५ कुंभार , ६ चांभार , ७ परीट , ८ न्हावी , ( ही दुसरी किंवा मधली कास किंवा वळ . या प्रत्येकाचा तीन पाचुंद्यावर हक्क आहे . ), ९ भट , १० मुलाणा , ११ गुरव , १२ कोळी ( ही तिसरी किंवा धाकटी कास किंवा वळ . या प्रत्येकास दोन पाचुंदे मिळतात ). याप्रमाणें पुढील बारा बलुते आहेत :- तेली , तांबोळी , साळी , माळी , जंगम , कळावंत , डवर्‍या , ठाकर , घडशी , तराळ , सोनार , चौगुला . हेहि हक्कदार आहेत ( मात्र यांचा हक्क ठराविक नाहीं ). कांहीं ठिकाणीं पुढीलप्रमाणें बलुतेदार आढळतात :- पाटील , कुळकर्णी , चौधरी , पोतदार , देशपांड्या , न्हावी , परीट , गुरव , सुतार , कुंभार , वेसकर , जोशी , यांत सुतार , लोहार , चांभार , कुंभार ही पहिली कास . न्हावी , परीट , कोळी , गुरव ही मधली कास आणि भट , मुलाणा , सोनार , मांग ही तिसरी कास होय . कोंकणांतील बलुतेदार यांहून थोडेसे निराळे आहेत ; इंदापूर परगण्यांतील बलुतेदार पुढीलप्रमाणें आढळतात :- पहिली कास - सुतार , लोहार , चांभार , महार . दुसरी कास - परीट , कुंभार , न्हावी , मांग . तिसरी कास - सोनार , मुलाणा , गुरव , जोशी , कोळी , रामोशी . एकूण १४ . पंढरपूर प्रांतांतील बलुतेदार :- थोरली वळ - महार , सुतार , लोहार , चांभार , मधली वळ - परीट , कुंभार , न्हावी , मांग . धाकटी वळ - कुळकर्णी , जोशी , गुरव , पोतदार . ग्रॅंटडफ याच्या मतानें - सुतार , लोहार , चांभार , मांग , कुंभार , न्हावी , परीट , गुरव , जोशी , भाट , मुलाणा हे बलुतेदार व सोनार , जंगम , शिंपी , कोळी , तराळ , वेसकर , माळी , डवर्‍यागोसावी , घडशी , रामोशी , तेली , तांबोळी , गोंधळी हे अलुतेदार आहेत . पुष्कळ जागीं महारास पहिल्या , दुसर्‍या किंवा तिसर्‍या वळींत धरतात . हल्लीं आढळणारे अलुतेदार किंवा नारु :- सोनार , मांग , शिंपी , भट , गोंधळी , कोरगू , कोतवाल , तराळ हे आहेत . तथापि अलुतेदार व बलुतेदार हे निरनिराळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे आहेत ; त्यामुळें त्यांची एकवाक्यता होणें कठिण . वरील कास म्हणजे , गांव ही गाय असून तिचें पीक ही कास होय ; आणि बलुतेदार ही या गाईच्या कासेला पिणारीं वासरें . अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे । - ज्ञा १३ . ३४ . [ सं . बली + अपत्य = बलुत्या ? ]

Related Words

बलुतें   बैत्या   बयत्या   बयतें   बलुता   बलुत्या   बैतें   बलोता   बलोतें   बलोतेदार   बलोत्या   बलुतेदार   धेडसुगी   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   जोसी   गुरव   घुगरी   जोशी   बलोंतें   आय   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP