कुलदैवत ओव्या - ओवी ४
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आठा दिसाच्या सोमवारी दिवस सोन्याचा उगवला
भोळा माझा महादेव बेलानं गर्द झाला
आठा दिसाचा सोमवार मनात आठवा
महादेवाच्या पूजेला दुरडी बेलाची पाठवा
आठा दिसा सोमवारी बेलाचा गुंफी हार
मामंजी सासर्यांना शिवाची भक्ति फार
आठा दिसा सोमवारी दर्शनाला येती जाती
भोळ्या ग शंकराच्या अर्ध्या अंगी पारबती
जटेतून गंगा व्हाती
अर्ध्या अंगी पार्वती जटेतून गंगा व्हाती
भोळ्या ग महादेवाच्या मांडीवरी गणपती
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP