कुलदैवत ओव्या - ओवी १३
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
व्रतामंदी व्रत सोमवार व्रत भारी
बेलाचं झाळ दारी शिवाच्या माथ्यावरी
व्रतामंदी व्रत शिवरात्री व्रत भारी
बेलाची तीन पानं चांदीची सुपारी
चला जाऊ पाहू काशीतलं तयं
सोन्याचं सीताफय पान्याच्या वरती खेयं
चला जाऊ पाहू काशीतला नंदी
बाळापूरचा किल्ला बांधला पान्यामंदी
चला जाऊ पाहू काशीतली रेती
इशीनाथाच्या देवळाले सोनं लागलं किती
जाते ईश्वरा तुले सुपारीचा डाव
शिवरात्री पारन्याले झाले नवरे महादेव
वलवले गहू दयतो कारनाले
महादेव झाले नवरे शिवरात्री पारन्याले
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP