कुलदैवत ओव्या - ओवी ५
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पहिली माझी ववी मी का गाईन नाजुक
संभूदेवाच्या पूंजला फुलं चढली साजुक
संभूदेव म्हणीती ग गिरजा नारीला येतो राग
भिल्लीणी तुजं रुप डोंगरी झाला बाग
माझ्या घरी पाव्हणा कैलासीचा आला पती
त्येला बसायाला घालीते चंदनाची पाटपेटी
देवाला निजायाला घातला पितळी पलंग
गिरीजानारीच्या हातात रेशमी दुपट्टा सणंग
हात मी जोडीते साळ्याच्या त्या मागाला
सोमवारी गुंफीयलं एक मुंडासं दोघांला
आंबल्या बारशीला दवणा वडीती गाड्यानं
संभू पावावं जोड्यानं
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP