कुलदैवत ओव्या - ओवी १६
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेवाला जाता सरके चंदन
संबाचं नाव घेता अवघे तुटले बंधन
महादेवाच्या वाटेनं खारकाचे बाई घोस
मह्या बाळराजाला कावड्याला येकादस
बळी महादेवाचा दोहीचा एक रस्ता
मधी राहिला गुमास्ता
महादेवा जाया झाली दर्शेनाची दाटी
शेजी तू माजे बाई दवना घे आडवटी
संबुच्या शिकरावरी बेल दवना वाहिला
दैवाच्या नारीनं संबू जोड्यानं पाहिला
शिकरीचा संबू मानदेसाला गेला कंदी
हारपला त्याचा नंदी
गिरिजाबाई माळियाची गंगाबाई कोळियाची
सक्या मह्या दयाळाची नाव चाले सतवाची
देसामंदी देस मानदेस बरवा
बारीक दवन्याचा गिरजा येचिती सरवा
माळी मोट भारी गिरजा नार दार धरी
पानी जातं बाई दवन्याच्या रोपावरी
संबू मनू संबू हाका मारितो कोळी
संबू शिकराजवळी दवन्याला पानी वळी
संबू मनू संबू हाक मारितो बळी
संबू शिकराच्या तळी वाटीतो दवना गोळी
पाचा कनसासरी महादेव गेला चोरी
काय सांगू गिरजा बळी आलाय अंगावरी
गोफनीनं गुंडे मारी
शिपायाचा साज केलास गिरजाबाई
वानीचा हुरडा कुनबी मोडू देत न्हाई
शिकरीचा संबू मानदेशीचा मोकाशी
करतो दवन्याच्या राशी
देसामंदी देस मानदेस काटंवन
गिरजा आपलं वतन
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP