कुलदैवत ओव्या - ओवी ९
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेवाच्या वाटेनं नाही खडे गोटे
पोहा गरजत येते शंभूच्या नावाचा
महादेवाच्या वाटेनं कापराचा पुडा मुंगयानं येळला
जन्मजन्मी जोडा पाण्यानं तोडला
कापराची पुडी धाडू कोण्या हाती
शंभूच्या भेटीसाठी येणं केलं रातोराती
महादेवाच्या वाटेनं सांडीयलं जीरं
पोहा चाले थीर थीर
महादेवाच्या वाटेनं सांडीयले जवस
नेते जोड्यानं नवस
महादेवाच्या वाटेनं सांडीयल्या तुरी
भक्ती केली पुरी
महादेवाच्या वाटेनं सांडं पोहा याचा
पोहा चांदियाचा शंभूच्या नावाचा
महादेवा पारबती चौरस खेले राती
भोळे शंकर पडले हाती
सोडला सोडला पोटीचा पोहरा
शंभू मायबाप दिल्लीचा सोयरा
सोडली सोडली पोटीची सकी
तुले वाहू केली खारकेची मुठी
सोडला सोडला शेजीचा भरतार
तुले वाहू केला नवा रतनांचा हार
संभाजीची शाल हिरवी कंकर
धवड्या घोड्यावर शंकर
पारबतीचा चुडा कशानं टिचकला
चौसर खेळता हात दुमता पडला
पारबतीचा चुडा केसाहुनी बारिक
शंभू महादेवा लेण्याची तारीफ
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP