कुलदैवत ओव्या - ओवी १८
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आठा दिसा सोमवारी गंगा येती परळीला
देवा माझ्या वैजूबाच्या गोसायाच्या आंघुळीला
हे ग फुलारीनबाई बेलाचे ग गुंफ हार
देवा माझ्या वैजूबाचा गोसायाचा सोमवार
केशरी ग लावी गंध अक्षत न झळझळी
देव वैजुबा ग माझा राजा पहावा संध्याकाळी
हरिहर तीर्थ काठ वल्ला कशानं झाला
देव वैजुबा माझा जटा निथळीत गेला
परळी गावामध्ये कोन भाग्याचा नांदतो
देवा माझा वैजूबाचा नित्य चौघडा वाजतो
परळी गावामध्ये कोन नांदतो खुशाल
देवा माझ्या वैजूबाची दिवसा जळती मशाल
काय सांगू बाई परळीची महिमा मोठी
देवा माझ्या वैजूबाच्या देऊळाला गारगोटी
देवाच्या देऊळात ही ग पारबत्ती बसंना
अशी कापूर भस्माची तिला गरदी सोसंना
गोपीनाथ भोयर्यात वैजनाथ ग उमाटी
अशी जगमित्र नागांनी देली मैदानी राहुटी
महाशिवरात्रीच्या दिशी घरोघरी ग बिर्हाड
देवा माझ्या वैजूबाचं दीनानाथाचं वर्हाड
सकाळी उठूनी लोक जाती ग मुजर्याला
देवा माझ्या वैजूबाला झोप लागली राजाला
पारवतीच्या सरीचं सोनं आहे शेरभर
देव वैजूबा माझा परळीचा जहागीरदार
माय माझ्या पारवतीची सखे जोडवी वाजती
देवा माझ्या वैजूबाच्या नंदी गढीचे बुजती
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP