कुलदैवत ओव्या - ओवी १२
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेव पार्वती खेयती एकी बेकी
पाखंडी पार्वती महादेवले लिघं जिकी
सोया रे महांदेव भोयी तुनी माता
तुना चलमले नही पूजी जय गाथा
बियाबानमधी उतरनं भीलवान
पार्वती कशी म्हने देवा तुनं गोतं उनं
महादेव पार्वती दोघी करिती विचार
पुतराबीगर कसा जाईल संवसार
महादेव कसा म्हने कसं हुईन पारवती
पोटे पुत्र नही कोनी करेना उजरागती
पार्वती कसी म्हने कसं हुई रे महादेवा
पोटना पुत्रबिना कोन करनार सेवा
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP