कुलदैवत ओव्या - ओवी ८
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेव म्हणे उभी ग उभी ग भिल्लणी
दंडावरी वेळा माझी गिरजा तुझ्यावाणी
महादेव म्हणे नार कुणब्याची आभांड
सोमवारी न्हाली ओली झाली माझी पिंड
भोळानी महादेव भोळी आहे तुझी भक्ती
मस्तकी वाहते गंगा शेजेला पारबती
भोळानी महादेव याला भोळानी म्हणू नयी
याच्या जटामंधी गुपीत गंगामाई
लंबे लंबे जटा कोण वागवितो जोगी
याच्या जटामंदी गंगा भागीरती दोघी
महादेवाने जटा आपटल्या ठायी ठायी
याला आकळेना आभांड गंगाबाई
श्रावणमासात पहिला सोमवार पडे
महादेवाच्या पिंडीवरी सव्वा लक्ष बेल चढे
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP