कुलदैवत ओव्या - ओवी १७
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
वेरुळ ह्या गावाची काय मी सांगू ख्याती
घ्रुश्णेश्वराच्या देवळात सांज सकाळ वाजंत्री
घ्रुश्णेश्वराच्या देवळात कोरीव काम फार
महादेवाच्या ग पिंडीवर चार गाईंचे खूर
तिन्ही ग सांजा झाल्या उभी दारात कपिला
तिचे दूध देते घ्रुश्णेश्वराच्या नैवेद्याला
वेरुळ गावची बढाई सांगते मी ज्याला त्याला
आपल्या दुधाचा अभिषेक घ्रुश्णेश्वराला
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP