कुलदैवत ओव्या - ओवी १४
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
म्हातारा संबुदेव दाडी लोळती भुईला
गिरजा बोलती माईला
म्हातारा संबुदेव दाडी लोळती केरात
गिरजा जानीच्या भरात
म्हातारा संबुदेव हालती त्याची मान
गिरजा बेगडाचं पान
म्हातारा संबुदेव गळती त्याची लाळ
गिरजा मसुराची डाळ
बळीच्या शिकरावरी संबुदेव सोडी जटा
गिरजा नारीचा हिय्या मोटा
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP