मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
प्रशस्‍ति

प्रसंग अठरावा - प्रशस्‍ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


श्रीगुरवे नमः । श्रीपति श्रीकारी नमोऽस्‍तु । सांगेन गड घेतल्‍याची मातु । ते ऐकोनि कमाईवंतु । ब्रह्मानंदें डुल्‍लती ॥१॥
जैसा भाग्‍यवंत बैसला भाग्‍यवंतापासीं । तें गुज बोलतां येरून येरांसी । विश्र्वास संचरे मनीं मानसीं तैसा अनुभव्या आनंद ॥२॥
जरी भाग्‍यवंतापासीं तस्‍कर आला । ते गुज न बोलती धरिला अबोला । तदन्यायें साधु जनासी आला । पाखांड देखोनियां ॥३॥
आत्‍मा तेजियावरी स्‍वार होऊन । उजव्या करें थापटिली मान । जें बोलतां जाला तें सांगेन । श्रोत्‍यांप्रती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP