मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि

प्रसंग अठरावा - निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


यालागीं साधुजनाची निखंदना । येवों न द्यावी आपुलिया वदना । हे ऐकोनि भाव धरील तो शाहाणा। उद्धरील पूर्वजातें ॥१२८॥
पहा साधुनिंदे एवढें पातक । त्रिभुवनीं न दिसे आणिक । हा तुम्‍हीं ऐकावा विवेक । श्रोते हो भाव धरूनियां ॥१२९॥
निंदा केल्‍या उजळेल साधक । निंदका वज्रलेप होय अधिक । जैसी ओळखा बिबव्याची टिक । निघेच ना प्रयत्‍नें ॥१३०॥
जैसी डोयीमध्यें घातल्‍या फणी । होय उवांलिखांची धुवनी । तैसा ओळखा साधुलागुनी । निंदकी केलें ॥१३१॥
जों जों निंदक करील छळणा । तों तों साधु सांडवेल मळिणपणा । जैसा मळयानिळ झळकतां जाणा । डहुळपणें निवळे ॥१३२॥
पहा भुजंग कातीस आला । आड लागोनि कातीं सांडवला । तदन्यायें निंदकांनीं केला । साधु लागुनी ॥१३३॥
पहा पाथरवटें पाषाण घडिला । मग तो टांक्‍या सोसून मूर्तावला । तैसें धैर्य पाहिजे साधूला । जन निंदी ते वेळे ॥१३४॥
ऐसे धैर्य धरिल्‍या उपरी। निंदक वंदून होती पुजारी । वाढविती भूषण थोरी । गुण मानल्‍या उपरी ॥१३५॥
मग साधु विनवी ईश्र्वरास । हिरोनि घेई माझ्या आयुष्‍यास । शीघ्र द्यावें त्‍या निंदकास । उपकार फिटावया ॥ १३६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP