मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
गोल्‍हाट व औटपिठ अर्धमातृका

प्रसंग अठरावा - गोल्‍हाट व औटपिठ अर्धमातृका

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तेथें पिंडब्रह्मांड ना भासे । स्‍वयंभ सदोदित असे । ओळखा चौर्‍यांशीचे फांसे । तुटले तेथें ॥३२॥
पुढें औटपिठ अर्धमातृका । जंगम लिंग ओंकार आइका । तेथूनि आत्‍मत्‍वाची सायका । सांगेन सद्‌गुरुखुणें ॥३३॥
मग तेथें खुंटलें येणें जाणें । सदोदित निश्र्चळ राहाणें । मी मजचिमाजी असणें । विदेहीपणें ॥३४॥
मग डाव्या टाकल्‍या कुंडलिनी । उजव्या घेऊनि जोगिणी । मनें चारी अवस्‍था भोगुनी । निवांत जालों ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP