मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
समाधीची व्याप्ती

प्रसंग अठरावा - समाधीची व्याप्ती

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐका या समाधीचा डेरा । एकविस स्‍वर्गांचा गाभारा । रवि शशि नव लक्ष तारा । पुष्‍पें मज घालिती ॥५५॥
चौदा भुवनांची उभारी । नव खंड पृथिवी काढिली बरी । सप्त पाताळें शेषावरी । स्‍थिरावली ॥५६॥
समाधीस बैसलों ना उभा । शुभ अशुभ नाहीं मज गाभा । सहजांत सहजाची शोभा । सोऽहं तत्त्वें प्रकाशें ॥५७॥
हे पूर्वीचीं समाधि जाण । मागुती घेतली जन्मा येऊन । शेख महंमद नाम भूषण । जळीं तरंग न्यायें ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP