मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
ग्रंथसमाप्ति

प्रसंग अठरावा - ग्रंथसमाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शेख महंमदे ग्रंथ निर्वाळिला वचनीं । समस्‍त श्रोत्‍यांवक्त्यांलागुनी । तें ऐकावें जी प्रश्र्निक होउनि । चतुरपणें ॥३०९॥
मी मतिहीन साबडें । ज्ञान बोलों नेणें धडफुडें । सरतें करावें वाडें कोडें । लडिवाळ म्‍हणोनिया ॥३१०॥
स्‍वयें बोलिलों नाहीं कुशल वाणी । तुम्‍ही श्रोते वक्ते कुशल ज्ञानी । हा ग्रंथ ऐकावा निज श्रवणीं । चर्चा विवेकें ॥३११॥
जैसा सिंधु भरला संपूर्ण । तृषावंत पक्षी घेती जीवन । सिंधु सुकला नाही स्‍थूळ लहान । परी नयनीं देखे ॥३१२॥
जैसें बाळक क्षुधेनें हळहळी । माता पान्हा घाली तये वेळीं । पोट धाल्‍या सांडतसे चळाळी । महीवरी अधिकपणें ॥३१३॥
तैसें नाम सांठवे ना हृदयवदनीं । उद्‌गार पडती विश्र्व श्रवणीं । तेणें आनंदती सुरवर मुनी । अनुभवें प्रेम दाटे ॥३१४॥
हा धांडोळित ‘योगसंग्राम’ । ठाऊकें पडे निजगुजाचें वर्म । सकळ तुटे द्वैताचा श्रम । बोध लागोनियां ॥३१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP