प्रसंग अठरावा - ग्रंथलेखनकाल
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मुख्यग्रंथविभाग
प्रसंग पहिला संपला भावे । दुसरा संपला भक्ति नांवें । तिसरा ज्ञान अनुभवें । समाप्त पैं ॥३१६॥
चौथा तो वैराग्य संपला । पांचवा बोधें प्रेमें चर्चिला । विवेके अनुभवाचा केला । सावध राजयोगें ॥३१७॥
ग्रंथलेखनकाल
पार्थीव नाम संवत्सर । ते दिवशीं ग्रंथ केला जाहिर । शुद्ध पौर्णिमा सोमवार । गुरुग्रहण पूर्ण होते ॥३१८॥
शुद्ध श्रावणांत पाडवा । अधिक पहिल्या सोमवाराची ठेवा । पुजा बेलपत्रीं सदाशिवा । नामघोषें ब्रह्मानंदें ॥३१९॥
सुमुर्तांमधील प्रातःकाळा । चढती रविचंद्राची प्रकाशकळा । तैसा सद्गुरूचा शब्द सोंवळा । हृदयीं प्रकाशला ॥३२०॥
संपूर्ण ग्रंथाची अवस्था । ऐका पूर्णिमेस केली पूर्णता । शरण शेख महंमद वक्ता । सद्गुरूचें चरणीं ॥३२१॥
ते दिवशी ग्रंथ संपविला । स्वयें सद्गुरुराजें लिहिला । शेख महंमद भूषण मिरविला । आपला आपलेपणें ॥३२२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP