मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
यमयातना-जीवास दंड

प्रसंग अठरावा - यमयातना-जीवास दंड

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


चस्‍म पलिस्‍तन जिस काफर । त्‍याला होईल अठरा खारूचा मार । गुर्गुज लागतां उडेल शरीर । धार्‍यांतूनि अणु जैसे ॥२९२॥
मागुते यम करितील सावध । पुसतील पापपुण्याचा भेद । ताम्र धरित्रीवरी शिजविती खदखद । धर्म केला नसतां ॥२९३॥
पहा हे शरीरसंबंधीचीं गात्रें । या जिवावरी मुइद होती एकत्रे । नेत्र म्‍हणतील येणें पाहिलें अविचारें । आम्‍हांमधूनियां ॥२९४॥
पाय म्‍हणती याचें धाविन्नलें मन । आम्‍हांस नेलें परद्वारालागून । वाचा म्‍हणेल सांडून नामस्‍मरण । मजकुन असत्‍य बोलविलें ॥२९५॥
मन म्‍हणे मज यानें चिथावलें । शीघ्रव्रत म्‍यां कुडीस तेथें नेलें । पुण्य सांडोनियां पाप यानेंच केलें । आम्‍ही फरमान बुद्धि ॥२९६॥
अवघें पाप पुण्य या जिवाच्या माथ्‍यावरी । मनानें पुरती घातली भरी । मग परमात्‍मा यातना करी । जिवालागी ॥२९७॥
काजी ज्ञानी प्रधान आणि राजा । या चौघांस आधीं पुस होईल वोजा । मग समस्‍तांच्या अवगुणा राजा । निस निघेल परियेसा ॥२९८॥
पुस करून पवित्र भिस्‍तीमधीं । चांडाळ दोजीखे घालिजेती आधीं । येर चांडाळाशीं खावया दोजखामधीं । चांडाळ दोजीखे घालिजेती आधी। येर चांडाळीशीं खावया दोजखामधीं । मेवा लाविला असे ॥२९९॥
जे मशिद बांधिती संसारा आलिया भीतरी । सहस्र सेवा कोठड्या महाल भिस्‍ती भीतरी । पुतळ्या सहस्र सेवा करिति परोपरी । त्‍या प्राणियांची ॥३००॥
भिस्‍तीमीतरी सुखें आनंद करी । दोजखीं जळती दोजखाभीतरीं । जन्म मरण की अद्यापवरी । शेख महंमद बोलिले ॥३०१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP