प्रसंग अठरावा - सृष्टि-प्रलय
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मेंढ्यांच्या वेषें असें मरण । त्यातें ईश्र्वर टाकितील मारून । मेहतर जब्राइलाच्या हातें ओळखा खुण । कुराण प्रसिद्ध ॥३०२॥
भिस्त ना मुसलमान जाल्यावांचून । जैसें मुसेंत पडतां अलंकार भूषण । ठेलें मोडेल नाना नगांचें भूषण । तसे महद कलमा करी ॥३०३॥
मिरां महंमदी मुसलमान । ते आल्याची सांगेन खुण । द्रव्य बाहेर पडेल खातल्याविण । भूमिमधील परियेसा ॥३०४॥
मुसलमान व्हावें म्हणितलें । विप्राशूद्रांस वाईट लागलें । विकासले वासनेस पाहिजे घातलें । निज मुसेमाजी ॥३०५॥
सुपरिताचें विपरित होईल । मनुष्य-स्त्री श्र्वानातें विईल । चंदन सुगंध सांडवेल । महत् प्रळयाचें अंतीं ॥३०६॥
एका झाडाची फळें एका झांडा । न कळे पापपुण्याचा निवाडा । केळीं येतील रुईच्या झाडा । बाभळेसी आंबे ॥३०७॥
पांच ओंव्या प्रलयपर त्या । चुकीस्तव राहिल्या आरत्या । कळों यावें श्रोत्यावक्त्यां । अनुभवेंशीं ॥३०८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP